सांगली – धनगर समाजोन्नती मंडळ युवक आघाडीच्या पहिल्या शाखेचं उद्घाटन जत तालुक्यातील बिरनाळ येथे करण्यात आलं आहे. धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली या शाखेचं उद्घाटन करण्यात आलं आहे. या समाजाचे युवा नेते सचिन मदने यांच्या हस्ते या शाखेचं उद्घाटन करण्यात आलं आहे. राज्यात ठिकठिकाणी ही शाखा स्थापन करण्याचा या मंडळाचा मानस आहे.
या मंडळाच्या माध्यमातून समाजातील युवा वर्ग एकाच छताखाली आणून धनगर समाजातील प्रत्येक उपेक्षित, वंचीत, शोषित पीडित यांच्यापर्यंत पोहचून त्यांच्या अडीअडचणींवर उहापोह करता येईल तसेच राजसत्तेसाठी राजकीय जनजागृती करण्याच्या उद्देशानं या मंडाळाची स्थापना करण्यात आली असल्याचं या मंडळानं म्हटलं आहे. तसेच समाजातील उचशिक्षित होतकरू व कष्टकरी गरजूंना या मंडळाकडून मदत करण्यात येणार आहे.
COMMENTS