नागपूर – नागपूरमध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनादरम्यान बुधवारी विधानसभेत ओबीसी मंत्री राम शिंदे यांनी ओबीसी, एसबीसी आणि एनटी संवर्गातील विद्यार्थ्यांच्या फायद्याची घोषणा केली आहे. यापुढे ओबीसी, एसबीसी आणि एनटी संवर्गातील विद्यार्थ्यांच्या क्रिमीलेयरची मर्यादा वाढवण्यात आली आहे.
यापूर्वी या संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 6 लाख रुपये मर्यादा ठेवण्यात आली होती. मात्र आज झालेल्या विधानसभेतील चर्चेदरम्यान राम शिंदे यांनी ती वाढवून 8 लाख करण्यात आली आहे. केंद्र सरकारने ओबीसी, एसबीसी आणि एनटी गटातील संवर्गासाठी ही मर्यादा वाढवली होती. त्याच धर्तीवर राज्यातही ही वाढवण्यात आली असल्याची माहिती राम शिंदे यांनी दिली आहे.
राज्य सरकारने केलेल्या या घोषणेमुळे राज्यातील ओबीसी, एसबीसी आणि एनटी संवर्गातील लाखो विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. सरकारच्या घोषणेमुळे या मर्यादेच्या पेचात अडकलेल्या अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
COMMENTS