नांदेड महापालिकेसाठी आज प्रचाराचा सुपरसंडे, भाजपचे अर्धाडझन मंत्री तर काँग्रेसचे 40 स्टार प्रचारक आखाड्यात !

नांदेड महापालिकेसाठी आज प्रचाराचा सुपरसंडे, भाजपचे अर्धाडझन मंत्री तर काँग्रेसचे 40 स्टार प्रचारक आखाड्यात !

नांदेड – महापालिका निवडणुकीपूर्वीचा आजचा शेवटचा रविवार असल्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आज मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत.  भाजपचे जवळपास अर्धा डझन मंत्री आज भाजपच्या उमेदवारांसाठी मते मागणार आहेत. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, महिला व बालकल्याण मंत्री पंकजाताई मुंडे, जलसंधारण मंत्री राम शिंदे,  भाजपा महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मा. विजयाताई रहाटकर या दिग्गजांच्या सभा आज होणार आहेत.

काँग्रेसकडून माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, पक्षाचे राज्य प्रभारी  मोहन प्रकाश, माजी मुख्यमंत्री  सुशीलकुमार शिंदे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री वर्षा गायकवाड,  भाई जगताप, अब्दुल सत्तार, रमेश बागवे, मोहमद नसीम खान, डॉ. विश्वजित कदम, शरद रणपिसे यांच्यासह ४० जणांच्या २० प्रभागामध्ये सभा होणार आहेत.

COMMENTS