परभणी – शिवसेनेचे खासदार संजय जाधव उर्फ़ बंडु व आमदार राहुल पाटील या दोन बड्या नेत्यातील शीतयुद्ध सुरु होते. गणेश विसर्जन मिरवणुकीत ही किरकोळ कारणावरून या दोन बड्या नेत्यांमधील संर्घष व्यासपिठावरच जगजाहीर झाला होता. या प्रकारानंतर खासदार संजय जाधव आणि आमदार राहुल पाटील यांच्यातील मतभेद शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समक्ष मिटले असून शिवसेना नेते रामदास क़दम आणि राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या यशस्वी मध्यस्थीने दोघानी यापुढे असे मतभेद होणार नाहीत असे वचन उद्धव ठाकरे यांना दिले आहे. शिवसेना भवन येथे रामदास क़दम यानी दोघाना साखर भरवुन हे मतभेद मिटले असे ज़ाहीर केले.
परभणीचे खासदार संजय जाधव व आमदार डॉ.राहुल पाटील यांच्या गेल्या अनेक दिवसांपासून संर्घष सुरु आहे. पक्षातील दोन बड्या व जबाबदार नेत्यांमध्ये शीतयुद्ध सुरु असल्याने पक्षातील सर्वसामान्य शिवसैनिकंमध्ये संभ्रमावस्था पसरली होती. मात्र खासदार संजय जाधव आणि आमदार राहुल पाटील यांच्यातील मतभेद अखेर मिटले आहे.
COMMENTS