आरएसएसच्या विरोधात लिहिलं नसतं तर गौरी लंकेश यांची हत्या झाली नसती – भाजप आमदार

आरएसएसच्या विरोधात लिहिलं नसतं तर गौरी लंकेश यांची हत्या झाली नसती – भाजप आमदार

बंगळुरू – ज्येष्ठ संपादक आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येच्या निषेधार्थ देशभर संताप व्यक्त केला जात असतना भाजपच्या एका आमदाराने केलेल्या वक्तव्यानं आगीत तेल ओतण्याचं काम केलं आहे. भाजपचे आमदार आणि माजी मंत्री जीवराज यांनी गुरूवारी चिकमंगळुरमधील कोप्पा तालुक्यात एका सभेत गौरी लंकेश यांच्या विषयी केलेले विधान सोशल मीडियातून व्हायरल झालं आहे. गौरी लंकेश यांनी आरएसएसच्या विरोधात लिखाण केलं नसंत तर त्यांना जीव गमवावा लागला नसता असं वक्तव्य जीवराज यांनी केलंय. इंडिया टुडेनं हे वृत्त दिलंय. तसंच इंडिया टुडेच्या हाती जीवराज यांची ऑडिओ क्लिप लागली आहे.

COMMENTS