मुंबई – मातोश्रीवर काल झालेल्या शिवसनेच्या बैठकीत शिवसेनेतील काही ज्येष्ठ नेत्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली. रामदास कदम आणि गजानन किर्तीकर यांनी ही नाराजी बोलून दाखवली. सूत्रांनी ही माहती दिली आहे. या बैठकीला नेते, संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुख उपस्थित होते.
पक्षातील पदाधिकारी नेमताना आम्हाला काहीही माहित नसते. आम्हाला विश्वासात घेतले जात नाही. पण आमदार निवडूण आणण्याची जबाबदारी आमच्यावर टाकली जाते. आणि निवडणूकीत काही अपयश आलं तर आम्हाला जाब विचारला जातो असंही कदम आणि किर्तीकर यांनी बोलून दाखवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान ज्येष्ठ नेत्यांच्या या नाराजीची दखल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. यापुढे पदाधिकारी नेमताना नेते आणि संपर्कप्रमुख यांना विश्वासात घेतलं जाईल असंही उद्धव यांनी म्हटलं आहे. पक्ष वाढीसाठी आता दर महिन्याला नेते, जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख यांनी बैठका घ्याव्यात असे आदेशही उद्धव यांनी दिले आहेत.
COMMENTS