धुळे जिल्हा परिषदेत भाजपनं बहुमताचा आकडा गाठला!

धुळे जिल्हा परिषदेत भाजपनं बहुमताचा आकडा गाठला!

मुंबई – राज्यातील सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचे निकाल हाती येऊ लागले आहेत. नागपूर, धुळे, पालघर, नंदुरबार, अकोला आणि वाशिम या जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी १० वाजल्यापासून सुरुवात झालीय. या जिल्हा परिषद निकालांकडे सर्वच पक्षांचं लक्ष लागलं असून आजी-माजी मंत्र्यांसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. धुळे जिल्ह्या परिषदेत भाजपच्या सत्ता स्थापनेचा मार्ग प्रशस्त झाला असल्याचं दिसत आहे. कारण भाजपनं बहूमताचा आकडा पार केला आहे. याठिकाणी भाजपनं 31 जागा जिंकल्या आहेत. अजून अधिकृत घोषणा बाकी आहे.

दरम्यान धुळे जिल्हा परिषदेत भाजपचे संग्राम पाटील मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.
रायपूर जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकला आहे.  तर नंदुरबार जिल्हा परिषदेत मंत्री के. सी पाडवींना धक्का बसला आहे. त्यांच्या पत्नी हेमलता पाडवी पराभूत झाल्या आहेत.तसेच नंदुरबार जिल्हा परिषदेत काँग्रेसचा बोलबाला असून ५६ पैकी १० जागी विजयी झाल्या आहेत.

COMMENTS