यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात 7 उमेदवारांनी घेतले नामांकन अर्ज मागे !

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात 7 उमेदवारांनी घेतले नामांकन अर्ज मागे !

यवतमाळ – यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात नामांकन अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी ७ उमेदवारांनी नामांकन अर्ज मागे घेतले आहेत. एकूण ३७ उमेदवारांचे ५१ अर्ज दाखल झाल्यानंतर अर्ज छाननीत ६ उमेदवारांचे अर्ज रद्द झाले होते. तर आता ७ उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणूक रिंगणात २४ उमेदवार असणार आहेत.

दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्यामध्ये संदीप देवकते, रशीद खाँ हमीद खाँ, संतोष बाबुसिंग जाधव, आनंद बळीराम गायकवाड , उपेंद्र बाबाराव पाटील, भीमराव धोंडबाजी झळके, शे. जबार शे. युसूफ यांचा समावेश आहे. तर भाजप बंडखोर उमेदवार पी बी आडे याांनी उमेदवारी कायम ठेवली आहे.

COMMENTS