सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार – विनायक राऊत

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार – विनायक राऊत

मुंबई – सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार असल्याची माहिती
खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे. तीस वर्षांपासून रखडलेले वैद्यकीय महाविद्यालय पुढील शैक्षणिक वर्षापासून (20-21) सुरू होणार आहे. या महाविद्यालयात कोकणातील आणि राज्यातील शंभर ते दीडशे विद्यार्थ्यांना या शिक्षण घेता येणार आहे. काल कोकणातील आमदार खासदार आणि पालकमंत्री तसेच आरोग्यमंत्री, बंदर विकासमंत्री यांची बैठक घेतली या बैठकीत हा अध्यादेश जारी केला असल्याचं खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.

याचवेळी कोकणातील बंदर पर्यटन आणि ग्रामविकास कामाचाही आढावा ग्रामविकास आणि बंदर विकास राज्यमंत्र्यांनी घेतला. कोकणातील घरकुल योजना पर्यटन आणि जेटी संदर्भात त्वरित निधींची उपायोजना करत प्रशासनाला आदेश जारी केले आहेत. कोकणात विशेष करून सिंधुदुर्गात पहिलं शासकीय महाविद्यालय सुरू होत आहे अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे.

COMMENTS