राहुल गांधींनी दिलेला सल्ला धक्कादायक होता,  राधाकृष्ण विखे पाटलांचा खळबळजनक खुलासा !

राहुल गांधींनी दिलेला सल्ला धक्कादायक होता, राधाकृष्ण विखे पाटलांचा खळबळजनक खुलासा !

मुंबई –  विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसचे ज्यष्ठ नेते राधाकृष्ण  विखे पाटील यांनी खळबळजनक खुलासा केला आहे. नगरच्या जागेसंदर्भात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर या जागेसाठी मी प्रयत्न करेन असं राहुल गांधी म्हणतील असं वाटलं होतं. मात्र, त्यांनी सुजय विखेंना काँग्रेसऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढण्याचा धक्कादायक सल्ला दिला असल्याचा खळबळजनक खुलासा विखे पाटील यांनी केला आहे. लोणी येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

दरम्यान  तसेच नगरमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार सलग तीनदा पराभूत झाला होता, म्हणून ही जागा काँग्रेसला सोडावी अशी आमची मागणी होती. निवडून येण्याची क्षमता असल्याने डॉ. सुजय विखेंना उमेदवारी द्यावी असा आमचा आग्रह होता. यासाठी मी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी चर्चा करीत असतानाच शरद पवार यांनी त्याचवेळी पत्रकार परिषद घेऊन आमचे वडील बाळासाहेब विखे-पाटलांबाबत अपमानास्पद वक्तव्य केले.

पवारांकडून आमच्या वडिलांबाबत केले गेलेले वक्तव्य मनाला वेदना देणारं होते. त्यामुळे डॉ. सुजय विखेंनी तडकाफडकी भाजपात जाण्याची घोषणा केली. तसेच मुलानेच भाजपात जाण्याचा निर्णय घेतल्याने आपण विरोधीपक्ष नेतेपदावर रहायचे नाही असं मी ठरवंल असल्याचंही विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

COMMENTS