पुणे – बालेकिल्ल्यात भाजपला धक्का, वडगाव-मावळ नगरपंचायतीत नगराध्यक्षपद गमावले !

पुणे – बालेकिल्ल्यात भाजपला धक्का, वडगाव-मावळ नगरपंचायतीत नगराध्यक्षपद गमावले !

पुणे – पुणे बालेकिल्ला असणा-या भाजपला वडगाव कातवी नगरपंचायत निवडणुकीत मोठा धक्का बसला असून भाजपने वडगाव-मावळ नगरपंचायतीत नगराध्यक्षपद गमावले आहे. या नगरपंचायतीत वडगाव कातवी नगरविकास समितिच्या मयूर ढोरे यांना बहुमत मिळाले.नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार भास्करराव म्हाळस्कर यांचा ९१० मतांनी पराभव करून मयूर ढोरे यांनी विजय मिळवला आहे.एकूण सहा उमेदवारांनी नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवली होती.

नगराध्यक्षपदासाठी मिळालेली मते 
मयूर ढोरे – 4333
भास्कर म्हाळसकर – 3423
पंढरीनाथ ढोरे – 3363
मनोज ढोरे – 227
देविदास जाधव – 100
जहीर फैस सोलकर – 37

दरम्यान नव्यानेच स्थापन झालेल्या वडगाव कातवीमध्ये पहिला नगराध्यक्ष होण्याचा मान ढोरे यांना मिळाला आहे. नगरपंचायतीमध्ये त्रिशंकू स्थिती असून एकूण भाजप ७, राष्ट्रवादी ७, मनसे १,  अपक्ष २ असं उमेदवार निवडून आले आहेत.

 

COMMENTS