राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती!

राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती!

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. कालिदास कोळंबकर यांच्या जागी वळसे पाटील यांची विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हंगामी विधानसभा अध्यक्षपदासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर राज्यपालांनी हंगामी अध्यक्षपदी दिलीप वळसे पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. त्यामुळे दिलीप वळसे पाटीलच उद्या हंगामी अध्यक्ष म्हणून बहुमत चाचणी घेणार आहेत.

दरम्यान, महाविकासआघाडीचे सरकार स्थापन होण्यासाठीचे अडथळे दूर झाले आहेत. उद्याच विरोधी पक्षनेतेपदी भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचं पत्र हंगामी विधानसभा अध्यक्षांना दिलं जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान दोन दिवसांपूर्वीच भाजपकडून विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी कालीदास कोळंबकर यांची नियुक्ती करण्यात आली होती.परंतु महाविकासआघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर आज अखेर विधानसभेचे हंगामी अध्यक्ष बदलले असून कोळंबकर यांच्या जागी दिलीप वळसे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

COMMENTS