आधी स्वतःच्या पक्षातील नालायक माणसं बघा – उद्धव ठाकरे

आधी स्वतःच्या पक्षातील नालायक माणसं बघा – उद्धव ठाकरे

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधींनी लालकृष्ण आडवाणींची काळजी करू नये स्वतःच्या पक्षातल्या नालायक माणसांकडे बघावे त्यांच्याविरोधात काय कारवाई करणार ते सांगा असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.तसेच काँग्रेसने दिलेला जाहीरनामाही देशासाठी घातक असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. यवतमाळमध्ये झालेल्या सभेत ते बोलत होते.

दरम्यान प्रियंका गांधी आणि राहुल गांधी हे देशातल्या जनतेला खोटी आश्वासनं देत असल्याचीही टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिंदू धर्म आणि परंपरा यांचं महत्त्व सांगतात. मात्र आडवाणींना मोदींनी जोडे मारून हाकललं अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती. त्यावर उद्धव ठाकरेंनी त्यांना खरमरीत उत्तर दिलं आहे. तुमचं सरकार असताना शेतकऱ्यांना नक्षलवादी ठरवून त्यांच्यावर गोळ्या चालवण्याचा आदेश कसा काय दिला होतात? आधी स्वतःच्या पक्षात किती नालायक माणसं आहेत ते बघा त्यानंतर आमच्याबद्दल बोला असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

COMMENTS