पालघरमधल्या गुंडांना धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही -उद्धव ठाकरे

पालघरमधल्या गुंडांना धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही -उद्धव ठाकरे

मुंबई – शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आज पालघर येथे पार पडली. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. पालघरमधल्या गुंडांना धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. इथल्या गुंडांना वाटत होतं की इथली जनता साधी भोळी आहे. इथल्या माता-भगिनींना मी गुंडगिरी बंद करण्याचं आश्वासन दिलं आहे. मला खात्री आहे की पालघरमध्ये विजय गावित यांचाच होणार असल्याचंही ते म्हणालेत.

दम्यान गोरगरीबांना जो छळेल त्याला कायद्याचा फटका आम्ही देणार आहोत. तुम्ही रात्री दार ठोठावलेत तरीही मदत करणारा खासदार म्हणजे राजेंद्र गावित आहेत. शिवसेना ही कायमच काम करणाऱ्या मर्दांच्या मागे ठामपणे उभी असते. गावकऱ्यांच्या पाठिशी मी उभा आहे. तुम्हाला जे पाहिजे ते दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

COMMENTS