परळीतील सभेत कॉलर उडवत उदयनराजे म्हणाले…

परळीतील सभेत कॉलर उडवत उदयनराजे म्हणाले…

बीड – सातारचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी परळी विधानसभा मतदारंघातील भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या समर्थनार्थ प्रचारसभा घेतली. यावेळी उदयनराजे यांनी कॉलर उडवत एक भाऊ निघून गेला तर काय झालं, हा भाऊ तुमच्यासोबत आहे, असा विश्वास पंकजा मुंडे यांना दिला. उरली सुरली राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस जरी एकवटून परळीत आली तरी पंकजा मुंडेंच्या कमळाला कोणी अडवू शकणार नाही. मी कोणाचा विश्वासघात केला नाही तर त्यांनीच माझा विश्वासघात केला असल्याचंही यावेळी उदयनराजे यांनी म्हटलं आहे.परळी येथील गणेशपार भागात पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ उदयनराजे भोसले यांच्या सभेचे आयोजन केले होते. यावेळी पंकजा मुंडे, खासदार प्रितम मुंडे, महादेव जानकर उपस्थित होते.

दरम्यान सभेत कॉलर उडवत एक बार मैने कमिटमेंट की तो मै अपने आप की भी नही सूनता, असे म्हणत त्यांनी याद राखा गाठ माझ्याशी आहे, असा इशाराही विरोधकांना दिला. एक बार जो मैने कमिटमेंट कर ली तो मै अपनी आप की भी नही सूनता, असा पुनराच्चार केला. तसेच स्ट्राँगरूम आणि मतमोजणी केंद्राभोवती नव्हे त्यांच्या तोंडाला जॅमर बसवा असा टोला यावेळी पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना लगावला.

COMMENTS