उदयनराजेंची ‘ती’ मागणी मान्य होत नसल्याने भाजप प्रवेश लांबणीवर ?

उदयनराजेंची ‘ती’ मागणी मान्य होत नसल्याने भाजप प्रवेश लांबणीवर ?

सातारा – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले हे भाजपमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. याबाबत आज बैठक पार पडणार होती. परंतु पुन्हा एकदा उदयनराजेंनी भाजपमध्ये जाण्याबाबत यू टर्न घेतला असल्याचं दिसत आहे. कारण खासदारीच्या राजीनाम्यानंतर विधानसभेची आणि लोकसभेची पोट निवडणूक एकत्र लावण्यासाठी उदयनराजेंचा आग्रह आहे. मात्र ही मागणी पूर्ण होत नसल्याने उदयनराजे संभ्रमात असल्याची माहिती आहे. तसेच राष्ट्रवादीत राहायचं की भाजपमध्ये जायचं याबाबत अजून कोणताच निर्णय झाला नसल्याचीही खात्रीलायक माहिती आहे..

दरम्यान या पार्श्‍वभूमीवर उदयनराजेंनी आज पुण्यात काही कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. मात्र, अचानक ही बैठक रद्द करण्यात आली. उदयनराजेंची तब्येत बरी नसल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच काही कार्यकर्त्यांनी भाजपात जाण्यास विरोध केल्याने उदयनराजेंनी थांबण्याची भूमिका घेतल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे भाजपाने आणखी दोन दिवस थांबण्याची भूमिका घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे उदयनराजे भाजपात जाणार की नाही याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.

COMMENTS