काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी कोरोना पॉझिटिव्ह, काँग्रेस नेते राज्यपालांना भेटणार?, पाहा काय म्हणाले बाळासाहेब थोरात!

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी कोरोना पॉझिटिव्ह, काँग्रेस नेते राज्यपालांना भेटणार?, पाहा काय म्हणाले बाळासाहेब थोरात!

मुंबई – नवीन कृषी कायद्याचा विरोध करत आज काँग्रेसचे शिष्टमंडळ प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यपालांना भेटणार होते. मात्र यातील काही दिग्गज नेते राज्यपालांच्या भेटीला जाणार नाहीत. याचे कारण म्हणजे
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

गुरुवारी २४ सप्टेंबर रोजी एक. के. पाटील मुंबईत आले होते. काँग्रेसच्या टिळक भवन या प्रदेश कार्यालयात त्यांनी राज्यातील नेत्यांबरोबर बैठकीही घेतली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, अमित देशमुख, सतेज पाटील, विश्वजित कदम, सत्यजित तांबे यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते.

परंतु एचके पाटील यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे राज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत आले आहेत. त्यामुळे याचा परिणाम काँग्रेस नेत्यांच्या आजच्या राज्यपाल भेटीवरही झाला आहे. राज्यपालांना भेटण्यासाठी या शिष्टमंडळात अशोक चव्हाण आणि काँग्रेसचे इतर नेते जाणार होते. मात्र एच. के. पाटील यांच्यासोबत गुरुवारी असलेले नेते वगळून इतर नेते आज राज्यपालांची भेट घेणार आहेत.

COMMENTS