कोल्हापूरचे पालकमंत्रिपद स्वीकारण्यास बाळासाहेब थोरातांचा नकार!

कोल्हापूरचे पालकमंत्रिपद स्वीकारण्यास बाळासाहेब थोरातांचा नकार!

मुंबई – महाविकास आघाडी सरकारमधील पालकमंत्र्यांची यादी काल जाहीर करण्यात आली. या यादीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना कोल्हापूरचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. परंतु थोरात यांनी हे पालकमंत्रिपद स्वीकारण्यास नकार दर्शवला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज भेट घेऊन थोरात आपला निर्णय कळवणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान अहमदनगरमधील संगमनेरचे आमदार असलेल्या बाळासाहेब थोरातांना कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. तर कोल्हापुरातील कागल मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेलेले आमदार आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर अहमदनगरचे पालकमंत्रिपद सुपूर्द करण्यात आले आहे. त्यामुळे
मुश्रीफ यांना कोल्हापूरचे पालकमंत्रिपद द्यावे आणि आपल्याऐवजी काँग्रेसमधील सहकाऱ्याला अहमदनगरचे पालकमंत्रिपद द्यावे, अशी विनंती थोरात करणार असल्याचं म्हटलं जात आहे. काँग्रेसच्या बारा मंत्र्यांपैकी 11 मंत्र्यांना पालकमंत्रिपदं मिळाली आहेत, मात्र डॉ. विश्वजीत कदम यांच्याकडे एकाही जिल्ह्याचे पालकत्व नाही. त्यामुळे अहमदनगरचं पालकमंत्रिपद कदम यांना मिळण्याची चिन्हं आहेत.

पालकमंत्र्यांचीी यादी

1 ) पुणे – श्री. अजित अनंतराव पवार

2. मुंबई शहर – श्री. अस्लम रमजान अली शेख

3. मुंबई उपनगर –  श्री. आदित्य उद्धव ठाकरे

4. ठाणे – श्री. एकनाथ संभाजी शिंदे

5. रायगड  – श्रीमती आदिती सुनिल तटकरे

6. रत्नागिरी – ॲड. अनिल दत्तात्रय परब

7. सिंधुदुर्ग – श्री. उदय रविंद्र सामंत

8. पालघर – श्री. दादाजी दगडू भुसे

9. नाशिक – श्री. छगन चंद्रकांत भुजबळ

10. धुळे – श्री. अब्दुल नबी सत्तार

11. नंदुरबार – ॲड. के.सी. पाडवी

12. जळगाव – श्री. गुलाबराव रघुनाथ पाटील

13. अहमदनगर – श्री. हसन मियालाल मुश्रीफ

14. सातारा – श्री. शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील

15. सांगली – श्री. जयंत राजाराम पाटील

16. सोलापूर – श्री. दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील

17. कोल्हापूर – श्री. विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात

18. औरंगाबाद – श्री. सुभाष राजाराम देसाई

19. जालना – श्री. राजेश अंकुशराव टोपे

20. परभणी- श्री. नवाब मोहम्मद इस्लाम मलिक

21. हिंगोली – श्रीमती वर्षा एकनाथ गायकवाड

22. बीड – श्री. धनंजय पंडितराव मुंडे

23. नांदेड – श्री. अशोक शंकरराव चव्हाण

24. उस्मानाबाद – श्री. शंकरराव यशवंतराव गडाख

25. लातूर- श्री. अमित विलासराव देशमुख

26. अमरावती – ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर (सोनावणे)

27. अकोला – श्री. ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू

28. वाशिम – श्री. शंभुराज शिवाजीराव देसाई

29. बुलढाणा – डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे

30. यवतमाळ – श्री. संजय दुलीचंद राठोड

31. नागपूर- डॉ. नितीन काशिनाथ राऊत

32. वर्धा- श्री. सुनिल छत्रपाल केदार

33. भंडारा- श्री. सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील

34. गोंदिया – श्री. अनिल वसंतराव देशमुख

35. चंद्रपूर – श्री. विजय नामदेवराव वडेट्टीवार

36. गडचिरोली – श्री. एकनाथ संभाजी शिंदे

COMMENTS