कोणाला कोणतं खाते मिळणार?, राष्ट्रवादीकडे जाणार ‘ही’ तीन महत्त्वाची खाती ?

कोणाला कोणतं खाते मिळणार?, राष्ट्रवादीकडे जाणार ‘ही’ तीन महत्त्वाची खाती ?

मुंबई – काही दिवसांपूर्वीच महाविकासआघाडी सरकार स्थापन झालं आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले आहेत तर त्यांच्यासोबत शिवसेना दोन, काँग्रेस दोन आणि राष्ट्रवादीतील दोन नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. परंतु अजूनही या मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आलं नाही. आज या मंत्र्यांना खातेवाटप केली जाण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाची दुपारी 3 वाजता बैठक पार पडणार असून या बैठकीत खातेवाटपावर चर्चा होऊ शकते. खातेवाटप झाले तर कोणाला कोणतं खातं मिळणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे अर्थ मंत्रालय, तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रालयाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहेत.
तसेच शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे आरोग्य मंत्रालय तर सुभाष देसाई यांच्याकडे पुन्हा उद्योग मंत्रालयाचीच धुरा दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तसेच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याकडे पुन्हा एकदा सार्वजनिक बांधकाम विभाग तर काँग्रेस नेते डॉ. नितीन राऊत यांच्याकडे सामाजिक न्याय विभागाचा पदभार सोपवला जाण्याची शक्यता आहे. तसेच या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीकडे तीन महत्त्वाची खाते दिली जाण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्रिपदासह गृह, अर्थ आणि सार्वजनिक बांधकाम ही तीन खाती राष्ट्रवादीकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीला एकूण 10 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्रिपदं मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

COMMENTS