शेतकऱ्यांच्या आंदोलनात भक्ती गीतांचा मळा फुलला

शेतकऱ्यांच्या आंदोलनात भक्ती गीतांचा मळा फुलला

मुंबई – केंद्र सरकारच्या कृषी विधेयक कायद्याच्या निषेधार्थ दिल्लीत गेल्या आठ दिवसांपासून शेतकऱ्याचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयसमोर खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जागर आंदोलन केले जात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर भजन कीर्तन आणि पिठलं भाकरी खाऊन केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला जात आहे.

शेतकरी आंदोलन पाठिंबा देण्यासाठी आज रात्री राज्यभर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जागर आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले होते. केंद्र शासनाचा कायदा शेतकऱ्यांवर अन्याय करणारा असल्याने तो मागे घेण्यात यावा. अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला. हे आंदोलन करीत असतानाच त्यांनी टाळ-मृदुंगाच्या संगतीने भजन सुरू केले. ‘सुंदर ते ध्यान उभे विटेवरी’, ‘जे का रंजले गांजले त्यासी म्हणावे आपले’ यासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनस्थळी ज्ञानोबा- तुकोबा यांच्या भजनांचा जागर रंगला होता. तर पुण्यातील आंदोलनाचे नेतृत्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विद्यार्थी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष अमोल हिपरगी यांनी केले. या आंदोलनात जेष्ठ कामगार नेते बाबा आढाव देखील सहभागी झाले होते.

COMMENTS