सुप्रिया सुळेंची अजित पवारांवर आघाडी !

सुप्रिया सुळेंची अजित पवारांवर आघाडी !

सोशल मीडियात फेसबूक आणि ट्विटरवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चांगलीच आघाडी घेतली आहे.  सुप्रिया सुळे यांच्या फेसबूक आणि ट्विटर यांच्या फॉलोअर्स संख्या अजित पवार यांच्या फॉलोअर्स पेक्षा जास्त आहे. अजित पवार यांचे फेसबूकवर 5 लाख फॉलोअर्स आहेत. तर सुप्रिया सुळे यांचे जवळपास 6 लाख आहेत. तीच परिस्थिती ट्विटरबाबत आहे. ट्विटरवर सुप्रिया सुळे यांचे सुमारे 1 लाख 21 हजार फॉलोअर्स आहेत. तर अजित पवार यांचे मात्र फक्त 42 हजार फॉलोअर्स आहेत. या दोन्ही माध्यमाचा सुप्रिया सुळे चांगला वापर करत आहेत. नुकतीच त्यांनी ट्विटरवर सेल्फी विथ पॉथहोल्स ही रराज्यातील विविध रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांविरोधात मोहीमही राबवली आहे. ती राज्यात चांगलीच गाजली. खुद्द चंद्रकांत दादा पाटील यांनी त्याची दखल घेतली.

COMMENTS