मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा तूर्तास नकार !

मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा तूर्तास नकार !

मुंबई – मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा तूर्तास नकार दिला आहे. त्यामुळे मराठा समाजाला दिलासा मिळाला आहे. मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर पार पडलेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या स्थगितीस नकार दिला आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी राज्य सरकारला नोटीस पाठवली असून उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांचा अवधी दिला आहे. त्यामुळे राज्य सरकार यावर काय उत्तर देणार हे पाहण गरजेचं आहे.

दरम्यान मराठा आरक्षणाविरोधातील दोन याचिकांवर आज महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली आहे. संजीव शुक्ला आणि अ‍ॅड. जयश्री पाटील यांनी मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या दोन याचिका सादर केल्या होत्या. मराठा आरक्षणाचे समर्थक विनोद पाटील यांनी कॅव्हिएट दाखल केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने ४५० हून अधिक जास्त पानांचा निकाल असून एकाचवेळी यावर निर्णय घेता येणार नसल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. राज्य सरकारने उत्तरानंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचंही न्यायालयानं म्हटलं आहे.

COMMENTS