आमदार अवधूत तटकरे शिवसेनेत जाणार, सुनील तटकरे म्हणतात…

आमदार अवधूत तटकरे शिवसेनेत जाणार, सुनील तटकरे म्हणतात…

मुंबई – राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांचा पुतण्या आणि श्रीवर्धन मतदारसंघातील आमदार अवधूत तटकरे हे शिवसेनेच्या वाटेवर आहेत. याबाबत अवधूत तटकरे यांनी गुरुवारी मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीवर सुनिल तटकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आमदार अवधूत तटकरे, माजी आमदर अनिल तटकरे हे राजकीय निर्णय घेण्यात सक्षम आहेत, अवधूत तटकरे व अनिल तटकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली आहे अशी माहिती मला मिळाली आहे. याबाबत मी त्यांच्याशी बोलेन. परंतु काय करायचं हा निर्णय त्या दोघांनीच घ्यावा. ते निर्णय घेण्यास मोकळे आहेत असं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान श्रीवर्धन मतदरसंघाचा उमेदवार कोण असेल हा निर्णय पक्षाचे अध्यक्ष शरद पवारच घेतील असंही सुनील तटकरे यांनी यावेळी म्हटलं आहे. तसेच माजी मंत्री भास्कर जाधव यांनी देखील शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली आहे. यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भास्कर जाधव हे पक्ष सोडतील असे मला वाटत नाही, असं तटकरे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS