सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या अडचणीत वाढ !

सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या अडचणीत वाढ !

मुंबई – सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सुभाष देशमुख यांच्याशी संबंधित असलेल्या लोकमंगलची खाती गोठवण्याची नोटीस सेबीनं पाठवली आहे. लोकमंगलचे डिमॅट खाते आणि म्युच्युअल फंडाची खाती गोठवून गुंतवणुकदारांचे 75 कोटी परत करण्याचे आदेश सेबीनं दिले होते. परंतु हे आदेश लोकमंगलने पाळले नसल्यामुळे आता सेबीनं कडक पाऊल उचललं असल्याचं दिसत आहे.

दरम्यान 16 मे 2018 रोजी गुंतवणुकदारांचे 75 कोटी रुपये 3 महिन्यात परत करण्याचे सेबीने दिले होते.मात्र मागील सहा महिने लोकमंगलने सेबीच्या आदेशाला उत्तरच दिले नाही. त्यामुळे सेबीने लोकमंगलची खाती गोठवण्यासाठी नोटीस जारी केली आहे. तसेच लोकमंगल अॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीबरोबरच, या नोटीसीमध्ये देशमुख यांच्या पत्नी स्मिता देशमुख, वैजनाथ लातूरे, औदुंबर देशमुख, शहाजी पवार, गुर्राना तेली, महेश देशमुख, पराग पाटील यांनाही नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यामुळे सुभाष देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली असल्याचं दिसत आहे.

COMMENTS