राज्याच्या राजकारणात बैल, डुकर, रानडुकरांचा बोलबाला

राज्याच्या राजकारणात बैल, डुकर, रानडुकरांचा बोलबाला

मुंबई – विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात सध्या राजकारण तापले असताना बैल, डुकर, रानडुकर आदी प्राण्यांचा बोलबाला वाढला आहे. तुम्ही म्हणालं हा काय प्रकार आहे. तर एकामेकांवर विविध पक्षांच्या नेत्यांनी आरोप-प्रत्यारोप करीत असताना पातळीच सोडली आहे. हे नेते एकमेकांना बैल, डुकर, रानडुकर आदी प्राण्यांची उपमा देऊन टिका करीत आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या निमित्ताने पदवीधर आणि शिक्षकांच्या प्रश्नांवर चर्चा न करता प्राण्यांची उपमा देऊन मनोरंजन करणाऱ्यांचा काय करायचे ते मतदारांनी ठऱवावे.
महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनंतर भाजपचे खासदार नारायन राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व शिवसेनेवर त्यांनी घणाघात सुरूच ठेवला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नारायण राणेंनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी, ‘निलेश राणे चार आणे, त्याचा बाप किती आणे हे मला माहित नाही’ अशा जहाल शब्दांत टीका केली होती.
यावर निलेश राणे यांनी पलटवार केला असून आक्षेपार्ह शब्दांत त्यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधला आहे. डुक्कर सत्तार अब्दुल, कॅबिनेट मंत्रिपदासाठी काँग्रेसमधून झाला गुल, शिवसेनेने राज्यमंत्री देऊन केला एप्रिल फुल. अब्दुल तुझी लायकी किती आणि तू बोलतो किती. राणे साहेबांचं नाव घेण्याची तुझी लायकी नाही. तुझ्यासारखे आमची गाडी धुतात. अवलादित रहा.’ असा इशारा निलेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिला आहे.

तर नागपूर पदधीवर निवडणुक प्रचारात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार बैलासारखे आहे. या सरकारला तुतारी घेऊन सतत टोचत राहावे लागते. त्याशिवाय ते पुढेच जात नाही, अशी टीका केली. त्याला प्रतित्तुर शिवसेनेच्या अनिल परब यांनी केंद्र सरकारला रानडुकराची उपमा दिली.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारला बैलाची उपमा देवून स्वतःची कातडी वाचविण्याचा केवीलवाणा प्रयत्न करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्याच केंद्रातील सरकारच्या कारभाराबाबत अनिभद्ज्ञ आहेत. केंद्रातले सरकार हे शेतकऱ्यांना अतिरेक्यांची उपमा देत आहेत. शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाला नेस्तानाभूत करणाऱ्या रानडुकरांसारखे आहे. आणि गडकरी हे त्यांच्यासोबत आहेत. बैल किमान शेतकऱ्यांचा मित्र असतो. आघाडी सरकार बैलासारखे असले तरी शेतकऱ्यांचे मित्र आहेतत मात्र आपण रानडुकराची भुमिका बजावणाऱ्या सरकारचा भाग आहात तेव्हा आधी आपले पहा, असा टोला लगावत शिवसेनेचे प्रवक्ते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी गडकरी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

COMMENTS