ग्रामीण भागातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय !

ग्रामीण भागातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय !

मुंबई –  राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकारच्या गृहविभागाकडून उपक्रम राबविला जाणार आहे. गाव तेथे पोलीस हा उपक्रम राबविला जाणार असून गेली काही दिवसांपासून ग्रामीण भागाती महिला, मुलींच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच अनेक ठिकाणी महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढत असल्यामुळे राज्य सरकार हा उपक्रम हाती घेणार आहे.

दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यात पहिल्यांदा प्रायोगिक पातळीवर ‘गाव तिथे पोलिस’ हा प्रयोग राबविण्यात आला असून यामुळे गावपातळीवर कायदा व सुव्यवस्था, तसेच गावामध्ये होणारे छोटे-छोटे तंटे, इतर घटनांची माहिती पोलिसांना मिळत आहे. त्याचा चांगला फायदा झाल्यामुळे हा प्रयोग राज्यभर करण्याचा मानस गृहविभागाने केला असल्याचं गृह राज्यमंत्री दीपक सावंत यांनी म्हटलं आहे. तसेच याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची एक राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. यामध्ये आयपीएस दर्जाचे अधिकारी, तसेच महिला पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.

 

 

 

COMMENTS