आधी नामांतर महाराष्ट्राच करा; आमदाराची अनोखी मागणी

आधी नामांतर महाराष्ट्राच करा; आमदाराची अनोखी मागणी

मुंबई – अहमदनगर किंवा औरंगाबादला एक इतिहास आहे. तो बदलून जबरदस्तीनं नामांतर करणं योग्य नाही. नामांतर करायचंच असेल, तर आधी महाराष्ट्राचं नाव बदलून राज्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्या. रायगडचं नाव बदलून संभाजी महाराजांचं नाव द्या. लोकांनाही ते आवडेल. मात्र, केवळ काही लोकांना डिवचण्यासाठी नामांतर करणं हे आपल्याला शोभत नाही,” असं आवाहन समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केले आहे.

सध्या महाराष्ट्रात औरंगाबाद शहराचे नामांतर करून संभाजीनगर करावे, यासाठी शिवसेना आग्रही आहे. त्यास महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये मतभेद आहेत. भाजप व मनसेने शिवसेनेच्या मागणीस पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. त्यात आता आणखी एका पक्षाची भर पडली आहे. तो पक्ष म्हणजे समाजवादी पक्ष. समाजवादी पक्ष हा महाविकास आघाडी सरकारचा घटक पक्ष आहे. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून अहमदनगरच्या नामांतरास विरोध दर्शला आहे.

अबू आझमी यांनी म्हटले आहे की, “महाराष्ट्रात जगभरातून, देशातून लोक येत असतात. तुम्ही राज्याला पुढं घेऊन जा. विकास करा. नवे जिल्हे निर्माण करा. लोक नक्कीच तुमचं कौतुक करतील. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांप्रमाणे हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करण्याचं काम करू नका. ते आपल्यासारख्याला शोभत नाही,’ शहरांची नावं बदलून कुणाचं पोट भरत नाही. शहरांना आवडीचं नाव ठेवायचंच असेल, तर नवी शहरं वसवून ठेवा. अहमदनगर किंवा औरंगाबादला एक इतिहास आहे. तो बदलून जबरदस्तीनं नामांतर करणं योग्य नाही. नामांतर करायचंच असेल, तर आधी महाराष्ट्राचं नाव बदलून राज्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्या. रायगडचं नाव बदलून संभाजी महाराजांचं नाव द्या. लोकांनाही ते आवडेल. मात्र, केवळ काही लोकांना डिवचण्यासाठी नामांतर करणं हे आपल्याला शोभत नाही,” असं आवाहन अबू आझमी यांनी केलं आहे.

COMMENTS