उस्मानाबाद – सत्ताधा-यांच्या डोळ्यावर झापड, विरोधकांची फुसकी पत्रकबाजी, शेतक-यांच्या घरावर दिवसाढवळ्या दरोडा !

उस्मानाबाद – सत्ताधा-यांच्या डोळ्यावर झापड, विरोधकांची फुसकी पत्रकबाजी, शेतक-यांच्या घरावर दिवसाढवळ्या दरोडा !

उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून शासनाकडून किमान हमी भावाने शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्याचा फार्स केला जात आहे. शासनाची हमीभाव खरेदी केंद्रही सुरू झाले आहेत. पण, या केंद्रावर उडीद मुगाशिवाय एक किलोही सोयाबीनची खरेदी झालेली नाही. याउलट खासगी व्यापाऱ्यांनी लाखो क्विंटल सोयाबीनची खरेदी केली आहे. प्रतिक्विंटल सोयाबीनचा भाव तीन हजार 50 रुपये असातना व्यापारी दोन ते अडीच हजार रुपये क्विंटल दराने खरेदी करीत आहेत.

शेतक-यांची अशी परवड सुरू असताना सत्ताधारी मूग गिळून गप्प आहेत. त्यांनी डोळ्यावर झापडी बांधली की काय अशी शंका येते.  तर दुसरीकडे विरोधक पत्रकबाजीच्या पुढे जायला तयार नाही. त्यामुळे व्यापा-यांचं, प्रशासानाचं आणि सरकारचं चांगलचं फावतंय. आणि शेतक-यांची सर्सार लूट सुरू आहे.

अशा वेळी खरतंर विरोधकांनी शेतक-यांना न्याय मिळवून द्यायला हवा. किमान शेत-यांसाठी आपण मनापासून प्रयत्न करत आहोत अभी भावना शेतक-यामध्ये निर्माण व्हायला हवी. मात्र पत्रकबाजी आणि इशारे देण्याच्यापुढे विरोधक जात नाहीत. आंदोलनाचा इशारा देणे, तीव्र आंदोलन करणे असे इशारे विरोधकांकडून वारंवार दिले जात आहेत. यासंबंधीचे निवेदन जिल्हाधिकारी, प्रसिद्धी माध्यमांकडे दिले जात आहे. परंतु, तीव्र आंदोलनातील तीव्र शब्द केवळ कागदावरच राहत आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनाही याचा घाम फुटत नाही. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळत नाही.

यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात संगनमत तर नाही ना ? असा प्रश्न शेतक-यांना पडलाय. मी आंदोलन करतो, इशारे देतो, तुम्ही सूस्त रहा. असंच काही दोघांमध्ये पडद्याआड घडतंय का ? असा प्रश्न शेतक-यांना पडू लागलाय. हिंसक आंदोलन नाही मात्र विरोधकांच्या आंदोलनाची सत्ताधा-यांना धास्ती लागली पाहिजे आणि शेतक-यांना काहीप्रमाणात तरी दिलासा मिळाला पाहिजे ही किमान अपेक्षा आहे. बघूयात आता तरी सत्ताधारी त्यांच्या डोळ्यावरील झापडी काढतील किंवा विरोधक सत्ताधा-यांची झोप उडेल असे आंदोलन करुन बळीराजाला न्याय देतील अशी अपेक्षा आहे.

COMMENTS