बार्शीत मराठा समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण,अनेक बसवर दगडफेक, एक बस जाळली ! पाहा व्हिडीओ

बार्शीत मराठा समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण,अनेक बसवर दगडफेक, एक बस जाळली ! पाहा व्हिडीओ

सोलापूर – आरक्षणाच्या मागणीवरुन राज्य सरकारविरोधात मराठा समाजाचं राज्यातील अनेक ठिकाणी आंदोलन सुरु आहे. बार्शीमध्ये सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण आलं असून याठिकाणी आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. बार्शी-सोलापूर रोडवर आंदोलकांनी अनेक एसटी बसवर दगडफेक केली आहे. तर एक एसटी बस पेटवून दिली आहे. तसेच काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून बार्शीतील एसटी बसस्थानक बंद करण्यात आलं आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांचे मोठे हाल होत असल्याचं दिसत आहे.

दरम्यान आरक्षणाच्या मागणीवरुन मराठा समाजानं आक्रमक पवित्रा घेतला असल्याचं दिसत आहे. मराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे, मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी न करणा-या महाविद्यालयांची मान्यता रद्द करा, राज्य सरकारच्या नोकर भरतीत घोषित केलेल्या १६ टक्के आरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अध्यादेश काढून त्यांचे त्वरीत कायद्यात रूपांतरण करावे, आण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतंर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत या मागणी आंदोलकांनी केल्या आहेत. तसेच राज्य सरकारनं लवकरात लवकर दखल घेतली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही या कार्यकर्त्यांनी दिला आहे.

एसटी बस डेपो बंद

COMMENTS