नारायण राणेंची हकालपट्टी करा, भाजपच्या जिल्हाध्यक्षांची मागणी!

नारायण राणेंची हकालपट्टी करा, भाजपच्या जिल्हाध्यक्षांची मागणी!

सिंधुदुर्ग – भाजपच्या ए बी फॉर्मवर खासदार झालेल्या नारायण राणे यांची हकालपट्टी करा अशी मागणी सिंधुदुर्ग भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी राज्य प्रभारी सरोजिनी पांडे यांच्याकडे केली आहे. जठार यांच्या या मागणीने सिंधुदुर्गमध्ये पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापणार असल्याचं दिसत आहे.

दरम्यान राणे हे भाजपच्या ए बी फॉर्मवर खासदार झाले असून ते सातत्याने भाजपवरच टीका करत आहेत. त्यामुळे भाजपचे नुकसान होत आहे. लवकरच अशा प्रकारचा ठराव जिल्हा कार्यकारिणीतही मांडण्यात येणार आहे. राणे यांनी सन्मानाने राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केलीय. जठार यांच्या या मागणीला भाजरचे पक्षश्रेष्ठी काय उत्तर देणार याकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS