21 ऑक्टोबरला शिवसेनेचा लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटणार !

21 ऑक्टोबरला शिवसेनेचा लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटणार !

अहमदनगर  – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. या निवडणुकांसाठी सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. शिवसेनेनंही एकला चलोची हाक दिल्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ 21 ऑक्टोबरला फुटणार आहे.शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी याबाबत माहिती दिली आहे.

महाराष्ट्रात 48 ठिकाणी शिवसेना सभा घेणार असून सभेची सुरुवात शिर्डीतून होणार असल्याचं  रामदास कदम यांनी म्हटलं आहे. 21 ऑक्टोबर रोजी उद्धव ठाकरेंची पहिली सभा शिर्डीमध्ये होणार आहे. याबाबत जोरदार तायरी सुरु असल्याची माहिती रामदास कदम यांनी शिर्डीत पत्रकारांशी बोलत असताना दिली आहे. यावरुन आगामी लोकसभा आणि विधानभा निवडणुका शिवसेना स्वबळावर लढवणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS