“कुणाच्या बापाची हिम्मत असेल तर रोखून दाखवा”, कंगनाच्या या इशाय्रानंतर शिवसेनेकडून जोरदार प्रत्युत्तर !

“कुणाच्या बापाची हिम्मत असेल तर रोखून दाखवा”, कंगनाच्या या इशाय्रानंतर शिवसेनेकडून जोरदार प्रत्युत्तर !

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री कंगणा रणौतनं पुन्हा एकदा ओपन चॅलेंज करत ट्वीट केलं आहे.’मी मुंबईत येऊ नये अशी मला बरेच लोक धमकी देत आहेत. म्हणूनच मी येत्या आठवड्यात मुंबईत येण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई विमानतळावर उतरण्याआधी मी मुंबईत येण्याची तारीखही कळवेन. कुणाच्या बापाची हिम्मत असेल तर रोखून दाखवा.’ असं कंगनानं धमकी देणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

कंगनानं पुढे स्माईल अपलोड करत म्हटलं आहे की 9 सप्टेंबर रोजी मी मुंबईत येईन. मुंबईत विमानतळावर उतरण्याआधी वेळ सांगेन. सोशल मीडियावरून धमक्या देणाऱ्यांपैकी कुणामध्ये हिंम्मत असेल तर रोखून दाखवा असं खुल आव्हान कंगनानं दिलं आहे.

त्यानंतर शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी कंगनाला इशारा दिला आहे.कंगना इथे आली तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत, असं ट्वीट सरनाईक यांनी केलं आहे.

COMMENTS