शिवसेनेच्या खासदाराचा विधानसभेला काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा!

शिवसेनेच्या खासदाराचा विधानसभेला काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा!

कोल्हापूर – आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या खासदारानं काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा दर्शवल्यामुळे शिवसेनेलाच मोठा धक्का बसला असल्याचं दिसत आहे. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या सतेज कार्यकर्ता मेळाव्यात शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा दर्शवला आहे. आमचं बी ठरलंय अस म्हणत मंडलिक कार्यकर्त्यांनी सतेज पाटील यांना विधानसभा निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. कोल्हापुरातील ड्रीम वर्ल्डमध्ये सतेज कार्यकर्ते मेळावा सुरु आहे. यावेळी त्यांनी पाठिंबा दर्शवला आहे.

दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी शिवसेना-भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठे धक्के बसले आहेत. परंतु अशातच शिवसेनेच्याच खासदारानं काँग्रेसला पाठिंबा दर्शवल्यामुळे कोल्हापुरात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी आपल्या मतदारसंखात सतेज कार्यकर्ता मेळावा सुरु केला आहे. आज कोल्हापुरातील ड्रीम वर्ल्डमध्ये सतेज कार्यकर्ता मेळावा सुरु आहे.यावेळी शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी काँग्रेसच्या व्यासपीठावर उपस्थिती लावत पाटील यांना पाठिंबा दर्शवला आहे. आमचं बी ठरलंय अस म्हणत मंडलिक कार्यकर्त्यांनी सतेज पाटील यांना विधानसभा निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे.

COMMENTS