शिवसेनेच्या आमदारांची संख्या 60 वर, या चार अपक्ष आमदारांनी दर्शवला पाठिंबा!

शिवसेनेच्या आमदारांची संख्या 60 वर, या चार अपक्ष आमदारांनी दर्शवला पाठिंबा!

मुंबई – विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे एकूण 56 आमदार निवडून आले आहेत. त्यानंतर सत्तेत आपली ताकद वाढवण्यासाठी चार अपक्ष आमदार शिवसेनेच्या गळाला लागले आहेत. त्यामुळे शिवसेना आमदारांची संख्या वाढली असून ती आता 60 वर गेली आहे. विधानसभा निवडणूक निकालानंतर रामटेकचे अपक्ष आमदार आशिष जयस्वाल आणि भंडाराचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर आता प्रहार जनशक्ती पक्षाने शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. काल प्रहार जनशक्तीच्या आमदार बच्चू कडू आणि आमदार राजकुमार पटेल यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेऊन पाठिंबा दिला आहे.

दरम्यान मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेना भाजपमध्ये सध्या रस्सीखेच सुरु झाली आहे.शिवसेना 50-50 च्या फॉर्म्युल्यावर ठाम आहे. तर भाजपला मात्र 50-50 चा फॉर्म्युला मान्य नाही. मुख्यमंत्रीपद न देता उपमुख्यमंत्रीपद शिवसेनेला देण्याची तयारी भाजपनं दर्शवली आहे. त्यामुळे यावर काय तोडगा काढला जाणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS