शिवसेनेला धक्का, ‘या’ आमदाराचा राष्ट्रवादीत प्रवेश, उद्या उमेदवारी अर्ज भरणार

शिवसेनेला धक्का, ‘या’ आमदाराचा राष्ट्रवादीत प्रवेश, उद्या उमेदवारी अर्ज भरणार

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे. कारण पालघरचे आमदार अमित घोडा यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. ते उद्या राष्ट्रवादीतून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. शिवसेनेने उमेदवारी नाकारल्याने अमित घोडा नाराज होते. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला.

दरम्यान अमित घोडा हे पालघर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत तसेच ते अनुसुचित जमाती कल्याण समितीचे सदस्य देखील आहेत. त्यांनी फेब्रुवारी 2016 मध्ये झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत राजेंद्र गावित यांचा पराभव केला होता. परंतु या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून माजी मंत्री राजेंद्र गावित यांना तिकीट दिल्याने नअमित घोडा यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

COMMENTS