सात महिन्यात पहिल्यांदाच असं घडलं, शिवसेनेचा मंत्री थेट देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला!

सात महिन्यात पहिल्यांदाच असं घडलं, शिवसेनेचा मंत्री थेट देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला!

मुंबई – राज्यातील राजकीय वातावरणात गेल्या सात महिन्याच्या कालखंडात पहिल्यांदाच असं घडलं असून शिवसेनेच्या मंत्र्यानं थेट विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. अनिल परब यांनी फडणवीस यांची भेटीदरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे सुद्धा उपस्थित होते.
अनिल परब हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खास निकटवर्तीय असूम ते थेट देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान आज विधिमंडळाचे कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार आहे. त्यासंदर्भात या बैठकीत चर्चा केली असल्याची माहिती अनिल परब यांनी दिली आहे. या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असं परब  यांनी सांगितले आहे. परंतु, गेल्या सात महिन्याच्या कालखंडात सत्ताधारी पक्षाचे नेते आणि मंत्री हे थेट विरोधी पक्षाच्या नेत्याला भेटीला आल्यामुळे एकच चर्चा रंगली आहे.

COMMENTS