शिवसेनेनं घेतला आणखी एक मोठा निर्णय?, केंद्रीय मंत्री अरविंद सावंत मोदींच्या भेटीला!

शिवसेनेनं घेतला आणखी एक मोठा निर्णय?, केंद्रीय मंत्री अरविंद सावंत मोदींच्या भेटीला!

नवी दिल्ली – राज्यात सत्ता स्थापन करण्यास भाजपनं नकार दिल्यानंतर आता सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेनं हालचाली सुरु केल्या आहेत. शिवसेनेनं मोदींच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. याबाबत शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अरविंद सावंत थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. या भेटीनंतर ते पत्रकार परिषद घेऊन ते आपली भूमिका जाहीर करणार आहेत.

दरम्यान फक्त केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा नाही तर थेट एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय शिवसेनेकडून घेतला जाऊ शकतो. त्यामुळे या पार्श्वभूमीवर दिल्लीत नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

राज्यात महाशिवआघाडी उदयास येणार

भाजपने सत्तास्थापनेस नकार दिल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे.
राज्यपालांनी दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असेलल्या शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे.
त्यामुळे राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे महाशिवआघाडीचे सरकार उदयास येणार आहे. सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादीने फॉर्म्युला तयार केला असल्याची माहिती आहे. यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद, तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद असेल. तर, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना गृहमंत्रीपद मिळण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

COMMENTS