शिवसेनेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर, त्यामुळे केली जगदीश शेट्टींची हकालपट्टी !

शिवसेनेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर, त्यामुळे केली जगदीश शेट्टींची हकालपट्टी !

मुंबई – शिवसेनेतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून माजी महापौर आणि विभागप्रमुख दत्ता दळवींचा फोन टॅप केल्याप्रकरणी मुलुंडचे उपविभागप्रमुख जगदीश शेट्टी यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. याबाबतची घोषणा आज शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून कऱण्यात आली आहे. तजगदीश शेट्टी यांचे यांचे काँग्रेस आमदार नितेश राणे यांच्याशी चांगले संबंध असल्यामुळे त्यांची पक्षातूक हकालपट्टी केल्याचंही बोललं जात आहे.

दरम्यान अंतर्गत वाद विकोपाला गेल्यानंतर माजी महापौर दत्ता दळवी यांनी ईशान्य मुंबईच्या विभाग सातचा राजीनामा दिला आहे. तर पक्षविरोधी बैठका घेतल्यामुळे शाखाप्रमुख दीपक सांवत यांचीही पक्षातून हकालपट्टी करणयात आली आहे. या घडामोडींमुळे शिवसेनेतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असल्याचं दिसत आहे.

 

 

COMMENTS