शिवसेनेचा दिल्ली ते गल्ली “दल बदलू” कार्यक्रम सुरुच-शेलार

शिवसेनेचा दिल्ली ते गल्ली “दल बदलू” कार्यक्रम सुरुच-शेलार

मुंबई – कृषी विधेयकाच्या विरोधात भारत बंदला पाठिंबा दिल्याच्या पार्श्वभूमीवर शेलार यांनी ट्विट करून शिवसेनेवर निशाणा साधला. शेलार म्हणाले,”दिल्लीत लोकसभेत शिवसेनेचा सीएए आणि कृषी विधेयकाला पाठिंबा आणि राज्यसभेत विरोध… महाराष्ट्रात प्रथम समृद्धी महामार्गाला विरोध आता श्रेयासाठी पाहणी दौरे सुरु… मुंबईत कोस्टल रोड, मेट्रो बाबतही अशाच आप-मतलबी भूमिका… दिल्ली ते गल्ली “दल बदलू” कार्यक्रम सुरुच!,” अशी टीका शेलार यांनी केली.

देशभरात उद्या होत असलेल्या भारत बंदमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. राज्याच्या सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेससह शिवसेनेनंही शेतकऱ्यांच्या भारत बंदला पाठिंबा जाहीर केला आहे. त्याचबरोबर पक्षाच्यावतीने संजय राऊत यांनी बंद पाळण्याचंही आवाहन केलं आहे. शिवसेनेनं जाहीर केलेल्या भूमिकेवरून भाजपाचे नेते आमदार आशिष शेलार यांनी जुन्या भूमिकेची आठवण करून देत शिवसेनेवर टीका केली आहे. आता भारत बंदमध्ये सहभागी होण्यासाठी जनतेला आवाहन करण्याऐवजी आतला खरा आवाज जो सत्तेसाठी तुम्ही बंद केलाय, त्याला एकदा आवाहन करुन पहा!,” असा टोलाही शेलारांनी लगावला आहे.

 

COMMENTS