शिवसेना-भाजपला धक्का, माजी खासदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश!

शिवसेना-भाजपला धक्का, माजी खासदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश!

नांदेड – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना-भाजप युतील मोठा धक्का बसला असून
तीस वर्ष शिवसेनेत असलेले आणि साडेचार वर्ष भाजपमध्ये राहिलेले माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी काल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात भाजपला हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान वानखेडे यांनी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे. गेली साडेचार वर्षांपासून ते भाजपमध्ये होते. त्यापूर्वी  वानखेडे हे शिवसेनेत होते. शिवसेनेत असताना त्यांनी हदगाव तालुक्यातील ल्याहरी गावचे सरपंचपद भूषविले.  त्यानंतर हदगाव विधानसभेचे ते शिवसेनेचे आमदार होते. 2009 मध्ये ते शिवसेनेचे हिंगोलीचे खासदार देखील होते.2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत वानखेडे यांचा पराभव झाला. त्यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काँग्रेसचा हात धरला आहे.

COMMENTS