‘या’ मतदारसंघात उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच युती, आघाडीतील नेत्यांमध्ये चुरस, अनेक नेते उतरले मैदानात!

‘या’ मतदारसंघात उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच युती, आघाडीतील नेत्यांमध्ये चुरस, अनेक नेते उतरले मैदानात!

मुंबई – अवघ्या काही महिन्यावर येऊन ठेपलेल्या विधानसभेच्या निवडणुकांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापू लागलं आहे. अनेक नेत्यांनी आपल्या पक्षांकडे उमेदवारीची मागणी केली आहे. शिवसेना-भाजप युती आणि काँग्रेस – राष्ट्रवादीमध्ये आघाडी जवळपास निश्चित झाली आहे. त्यामुळे युती आघाडीतील सर्वच पक्षांच्या नेत्यांना उमेदवारी मिळण कठिण आहे. परंतु तरीही शिवसेना-भाजप आणि काँग्रेस – राष्ट्रवादीमधील अनेक नेत्यांनी उमेदवारीचा दावा केला आहे. त्यामुळे आता उमेदवारी कोणाला द्यायची ही मोठी अडचण वरिष्ठ नेत्यांपुढे येवून ठेपली आहे.

दरम्यान सांगलीतील तासगांव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात अनेक नेत्यांनी उमेदवारीसाठी दावा केला आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार सुमनताई पाटील यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे. परंतु तरीही कवठेमहांकाळमधुन काँग्रेसकडुन अविराजे शिंदे यांनी उमेदवारी मागितली आहे.

तसेच हा मतदारसंघ युतीतील शिवसेनेकडे असला तरी याठिकाणी माजी मंत्री अजीतराव घोरपडे यांनी भाजपकडुन लढण्यास इच्छा व्यक्त केली आहे. हा मतदारसंघ वरीष्ठ पातळीवरुन भाजपासाठी सुटेल असा त्यांना विश्वास आहे. त्यांनी तासगावात पत्रकार परिषद घेऊन विधानसभेसाठी शड्डु ठोकला आहे.एवढच नाही तर त्यांनी तालुक्यात गावभेटी चालू केल्या आहेत. त्यांच्यासाठी खासदार संजयकाका पाटील यांनी आपली तासगाव व कवठेमहांकाळची सर्व ताकद उभी केली आहे. याठिकाणी शिवसेनेकडुन दिनकर पाटील यांनी लढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे याठिकाणी आघाडी आणि युतीकडून कोणाला उमेदवारी मिळणार हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS