जागावाटपाच्या पहिल्या फेरीत ‘या’ फॉर्म्युल्याबाबत खलबतं, शिवसेनेला मात्र अमान्य?

जागावाटपाच्या पहिल्या फेरीत ‘या’ फॉर्म्युल्याबाबत खलबतं, शिवसेनेला मात्र अमान्य?

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेतील जागावाटपाची पहिली फेरी काल पार पडली. या फेरीत 160+110+18 हा फॉर्म्युल्याबाबत खलबतं सुरू असल्याचं दिसत आहे. परंतु हा फॉर्म्युला
भाजपला अमान्य असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या फॉर्म्युल्यानुसार महायुतीतील इतर घटकपक्षांना 18 जागा देण्यावर दोन्ही पक्षांची सहमती झाली असल्याची माहिती आहे. परंतु उरलेल्या 270 जागांपैकी भाजप 160 तर शिवसेनेला 110 जागा देण्याच्या फॉर्म्युल्यावर खलबतं सुरु आहेत. परंतु शिवसेनेला मात्र हा फॉर्म्युला मान्य नसल्याची माहिती आहे. या बैठकीत भाजपतर्फे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन तर शिवसेनेतर्फे सुभाष देसाई हे उपस्थित होते.

दरम्यान प्राथमिक फेरीत समोर आलेला हा फॉर्म्युला अंतिम नसून यावर चर्चेच्या आणखी काही फेऱ्या पार पडणार आहेत. त्यानंतर अंतिम जागावाटप ठरणार आहे. त्यामुळे पुढील बैठकीत शिवसेनेला जागा वाढवून दिल्या जाऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे.

तसेच शिवसेनेसोबत युती करा, तडजोड नाही,’ अशा थेट सूचना पंतप्रधान मोदींनीही भाजप अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्याची माहिती आहे. त्यामुळे भाजप काय भूमिका घेणार हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS