भाजप-शिवसेनेमधील जागावाटपाची चर्चा स्थगित ?

भाजप-शिवसेनेमधील जागावाटपाची चर्चा स्थगित ?

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप-शिवसेनेमधील युती जवळपास निश्चित मानली जात आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाची चर्चा सुरु असल्याचं बोललं जात होतं. परंतु ही चर्चा सध्या स्थगित
करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेनंतर म्हणजेच १ सप्टेंबरनंतर जागा वाटपाची पुन्हा चर्चा सुरु होणार असल्याची माहिती आहे. तसेच जागावाटपाचा कोणताही एक फार्म्युला अजूनही तयार नसून चर्चेत प्रगती नसल्याची माहिती आहे.

दरम्यान जागावाटपावरुन शिवसेना-भाजपमध्ये
रस्सीखेच सुरु असल्याचं दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जुन्या फॉर्म्युला विषयी वक्तव्य करत यंदा आम्ही अधिक जागा मागणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना-भाजप युतीमध्ये जागावाटपाचा निर्णय हा मी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा तिघे मिळून ठरवू. जागावाटपाचा अधिकार आम्हा तिघांना आहे असं वक्तव्य केलं होतं.

COMMENTS