…तर शिवसेना-भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार ?

…तर शिवसेना-भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार ?

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपची युती झाल्याची चर्चा आहे. परंतु शिवसेना-भाजपकडून स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी चाचपणी सुरु असल्याचं बोललं जात आहे. परंतु युती करायची की स्वतंत्र निवडणूक लढवायची याबाबतचा निर्णय वंचित बहूजन आघाडीच्या भूमिकेनंतर घेतला जाणार असल्याचं बोललं जात आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून वंचितशी बोलणी सुरु आहे. परंतु, त्याला अजूनही यश आले नसल्याचं दिसत आहे. वंचित बहूजन आघाडी स्वतंत्र निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे. वंचित आघाडी स्वबळावर लढल्यास त्याचा फायदा भाजपलाच होणार आहे. परंतु वंचित बहूजन आघाडी जर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत सामील झाली तर भाजप आणि शिवसेनेला स्वबळाची तयारी करून देखील युती करावी लागणार आहे. त्यामुळे वंचितच्या निर्णयावरच भाजप-शिवसेना युतीच भवितव्य अवलंबून असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीनंतर भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तर शिवसेनेला देखील बळ मिळाले आहे. अनेक विधानसभा मतदारसंघात भाजप आणि शिवसेना यांना आघाडी मिळाली आहे. त्यामुळे भाजपला विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्याचा विश्वास आहे. परंतु, हा विजय शिवसेनेला सोबत घेऊन मिळवायचा की, एकट्याने यावर पक्षात संभ्रम आहे. त्यामुळे भाजपकडून युती असल्याचे सांगण्यात आले असले तरी अनेक मतदारसंघात स्वबळावर लढण्याची तयारी सुरू असल्याचे बोललं जात आहे. तर शिवसेनेनं देखील स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी सुरु केली असल्याची चर्चा आहे. त्यामुळे वंचित आघाडीनं स्वबळावर निवडणूक लढवली तर शिवसेना-भाजप दखील स्वतंत्र निवडणूक लढवतील असं बोललं जात आहे.

COMMENTS