जितेंद्र आव्हाडांच्या टीकेला शिवेंद्रराजे भोसलेंचं प्रत्युत्तर !

जितेंद्र आव्हाडांच्या टीकेला शिवेंद्रराजे भोसलेंचं प्रत्युत्तर !

सातारा – राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या टीकेला शिवेंद्रराजे भोसले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. आजपर्यंत पक्षात होतो तेव्हा वारसा दिसला नाही. मात्र पक्ष सोडताच त्यांना माझा कसा वारसा दिसू लागला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी किंवा कोणीही माझा वारसा काय आहे मला सांगू नये. मी देखील राजकारणात जे काही मिळवलं ते संघर्ष करूनच मिळवलं असल्याचं शिवेंद्रराजेंनी म्हटलं आहे.

दरम्यान काल शिवेंद्रराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यानंतर आव्हाड यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. ज्या राजेंचा वारसा सांगतात त्या शिवाजीराजेंनी केवळ 16 मावळ्यांना घेऊन तोरणा जिंकला होता. प्रवाहाविरुद्ध पोहणारेच इतिहास रचतात. शिवेंद्रराजे हे शिवरायांचे वारसदार नसून राजेंचे खरेच वारसदार आम्ही आहोत. कारण प्रवाहाविरुद्ध जाऊन आम्ही सत्ता मिळवून दाखवू. शिवेंद्रराजेंना त्यांच्या मतदारसंघाची इतकीच काळजी होती तर त्यांना पाच वर्षात विधानसभेत किती प्रश्न विचारले हे साताऱ्यात सांगावं मी त्यांच्या पाया पडून माफी मागतो असं जितेंद्र आव्हाड यांनी शिवेंद्रराजेंवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यानंतर शिवेंद्र राजे यांनी आव्हाडांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

COMMENTS