पुणे लोकसभा मतदारसंघातून शरद पवार लढणार ?  पहिल्यांदाच पवारांनी केलं भाष्य !

पुणे लोकसभा मतदारसंघातून शरद पवार लढणार ?  पहिल्यांदाच पवारांनी केलं भाष्य !

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गेल्यावेळी म्हणज्येच 2014 मध्ये कोणतीही लोकांमधील निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र तरीही शरद पवार पुणे लोकसभा मतदारसंघातून 2019 मध्ये लोकसभा निवडणुक लढवणार अशी चर्चा अधून मधून सुरू आहे. यावर आजपर्यंत शरद पवार काहीच बोलले नाहीत. किंवा पक्षातर्फेही यावर काहीच उत्तर दिलं नव्हतं. द हिंदू या इंग्रजी वर्तमान पत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी पहिल्यांदाच या विषयावर भाष्य केलं. ही चर्चा मुळात सुरू झाली कशी याचाही किस्सा त्यांनी मुलाखतीमध्ये सांगितला.

गेली 14 वेळा मी निवडणूक लढवली आणि जिंकली. त्यामुळे कोणतीही सुरक्षित जागा शोधण्याची मला गरज नाही. काही दिवसांपूर्वी काही अराजकीय कार्यकर्ते आणि काही उद्योजक येऊन पवारांना भेटले. त्यांनी पवारांना पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची गळ घातली. कोणत्याही पक्षाचे सरकार आले तरी पुण्याला फारसे महत्व दिले जात नाही. त्यामुळे पवारांनी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवावी अशी विनंती केली. त्यामुळे पवार पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरू झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पण सुप्रिया सुळे या बारामतीमधून लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. पुणे शहरातील बराचसा भाग त्यांच्याही मतदारसंघात येतो. त्यामुळे पुण्यातून आपल्याला निवडणूक लढवण्याची गरज नाही असंही पवारांनी स्पष्ट केलंय. मात्र पवार जे बोलतात ते करत नाही आणि जे करतात ते बोलत नाही. त्यामुळे आता नकार देत असले तरी पुढे  काय करतात ते पहावं लागेल.

COMMENTS