मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणेंसह इतर पक्षातील अनेक नेते आज  बांधणार शिवबंधन !

मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणेंसह इतर पक्षातील अनेक नेते आज बांधणार शिवबंधन !

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसेला जोरदार धक्ता बसला असून मनसेचे एकमेव आमदार असलेले शरद सोनवणे आज शिवबंधन बांधणार आहेत. त्याचबरोबर इतर पक्षातील अनेक पदाधिकारी देखील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज दुपारी १:३० वाजता शिवसेना भवन दादर येथे ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

दरम्यान गेली काही दिवसांपासून आमदार शरद सोनवण हे शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा होती. तसेच आपण मनसेत खूश असल्याचंही काही दिवसांपूर्वी सोनवणे यांनी म्हटलं होतं. परंतु आज ते शिवसेने प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालं आहे. आज दुपारी १:३० वाजता शिवसेना भवन दादर येथे ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

COMMENTS