शरद पवार पुन्हा मैदानात, मराठवाड्यातील ‘या’ भागांची करणार पाहणी, शेतकय्रांना मदत जाहीर करणार ?

शरद पवार पुन्हा मैदानात, मराठवाड्यातील ‘या’ भागांची करणार पाहणी, शेतकय्रांना मदत जाहीर करणार ?

मुंबई – राज्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील शेतकय्रांचे मोठे नुकसान झाल्यामुळे या भागाची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पुन्हा मैदानात उतरले आहेत. पवार हे
मराठवाड्याचा दोन दिवसीय दौरा करणार आहेत.18 आणि 19 ऑक्टोबररोजी ते मराठवाड्यात असणार आहेत. यावेळी ते
उस्मानाबाद आणि लातूर या भागांचा दौरा करणार आहेत. तुळजापूर, उमरगा,औसा, परंडा ,उस्मानाबादमधील भागांना भेटी देणार आहे. या भेटीत ते अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचा आढावा घेणार आहेत.

दरम्यान यापूर्वी शरद पवार यांनी निसर्ग चक्रीवादळानंतर कोकण दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी तेथील परिस्थितीची आढावा घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती. यानंतर राज्य सरकारकडून नुकसान भरपाईसंबंधी निर्णय घेण्यात आले होते. त्यामुळे आतादेखील शरद पवार यांच्या मराठवाडा दौऱ्यानंतर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाईचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. परतीच्या पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक नुकसान झालं आहे. त्यामुळे केवळ घोषणा नको, ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने मदत द्या अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

या पार्श्वभूमीवर वेळ पडल्यास सरकार कर्ज काढून शेतकऱ्यांना मदत करेल, असे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता शरद पवार यांच्या मराठवाडा दौऱ्यानंतर राज्य सरकार शेतकऱ्यांच्या मदतीबाबत काय निर्णय घेणार हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS