या प्रकरणाकडे मी गांभीर्यानं बघत नाही ; पवारांचे सूचक विधान

या प्रकरणाकडे मी गांभीर्यानं बघत नाही ; पवारांचे सूचक विधान

मुंबई – सध्या राज्यात धनंजय मुंडे याच्यावर झालेला बलात्काराचा आरोप, नवाब मलिका यांच्या जावयाला झालेली अटक आणि औरंगाबाद नामांतर या विषयी विरोधक सत्ताधारी महाविकास आघाडीला घेरण्याचा प्रयत्न करीत आहे. यावर आज महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

औरंगाबादच्या नामांतरावरुन महाविकास आघाडीमध्ये शिवसेना आणि काँग्रेसमध्ये एकमत नसून परस्परविरोधी वक्तव्यं केली जात आहेत. काँग्रेस नामांतराला विरोध करत असताना मुख्यमंत्री कार्यालायच्या ट्विटर हँडलवर औरंगाबादचा ‘संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचा धाराशिवर असा उल्लेख करण्यात आल्यानंतर हा वाद नव्याने निर्माण झाला होता. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत खुलासा करीत आपण वर्षानुवर्ष ही मागणी करत असल्याचं सांगत भूमिकेवर ठाम असल्याचं दाखवलं आहे. त्यामुळे काँग्रेस व शिवसेना नेत्यांमध्ये वाक् युध्द रंगत आहे.

नामांतराच्या विषयावर प्रमुख शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. शरद पवार यांनी सांगितलं की, “आमच्यात वाद नाहीत. संभाजीनगर म्हणा, धाराशिव म्हणा, नाहीतर अजून काही म्हणा..या प्रकरणाकडे मी गांभीर्यानं बघत नाही. त्यामुळे मी कधीही भाष्य केलं नाही”.

COMMENTS