शरद पवारांची बहूप्रतीक्षित मुलाखत आज होणार !

शरद पवारांची बहूप्रतीक्षित मुलाखत आज होणार !

पुणे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेणार असलेल्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत आज होणार आहे. बुधवारी सायंकाळी पाच वाजता पुण्यातल्या बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्सच्या मैदानावर ही बहुप्रतीक्षित मुलाखत होणार आहे. ‘शोध मराठी मनाचा’ या संमेलनाच्या निमित्ताने ही खुमासदार मुलाखत विनामूल्य पहायला मिळणार आहे. यावेळी शरद पवार यांच्या 50 वर्षांच्या राजकीय, सामाजिक, कृषी, क्रीडा आणि सांस्कृतिक प्रवासाचा सन्मान माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

मुक्त संवाद… दोन पिढ्यांचा या विशेष संकल्पनेवर आधारित  माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची ही मुलाखत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे घेणार आहेत. यातून पन्नास वर्षांचा राजकीय-सामाजिक आणि सांस्कृतिक प्रवास उलगडला जाणारा आहे. या मुलाखतीद्वारे रसिकांना एका मनमोकळ्या आणि महाराष्ट्राची स्थिंतत्यरे सांगणाऱ्या महत्त्वपूर्ण अशा संवादाचे साक्षिदार होण्याची संधी मिळणार आहे. याचवेळी मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.  तसेच कला-साहित्य-संस्कृती क्षेत्रातील योगदान देणा-या मराठी व्यक्तींचा यावेळी विशेष गौरव करण्यात येणार आहे.

COMMENTS